दोन लिंबू आणि कोळसा खाऊन ‘तो’ त्या बेटावर ५ दिवस जिवंत राहिला!

WhatsApp Group

Man survives on island : ओसाड आणि निर्जन भागात तुम्ही एकटेच अडकलात, तर काय होईल? माणसं नाहीत, खाद्यपदार्थ नाहीत. दूर दूरपर्यंतही घरी परतण्याचा मार्ग नाही. अशा स्थितीत एक क्षण कसा जातो, हे जाणून घेणं कठीण आहे. असंच काहीसं दृश्य काही वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात दिसलं होतं, जेव्हा हृतिक रोशन आणि अमिषा पटेल एका निर्जन बेटावर अडकले होते. पण चित्रपटातील अशी दृश्यं खूप रोमँटिक दिसतात, वास्तविक जीवन असं अजिबात नाही. ब्राझीलमध्ये दोन लिंबू आणि कोळशाच्या बळावर एका व्यक्तीनं स्वतःला पाच दिवस जिवंत ठेवले. समुद्राच्या जोरदार लाटांमुळं नेल्शन नेडी नावाचा माणूस एका निर्जन बेटावर पोहोचला होता. जिथं काहीही नव्हतं, तिथं दोन लिंबू आणि मच्छिमारांच्या सोडलेल्या तंबूच्या सहाय्यानं नेल्सन निर्जन बेटावर पाच दिवस राहिले.

कसे जिवंत राहिले?

व्यवसायानं माळी असलेले ५१ वर्षीय नेल्शन ब्राझीलमधील रिओ डी ज्वेलरी येथील ग्रुमारी बीचवर जाण्याच्या प्रयत्नात असताना एका निर्जन बेटावर अडकले. जोरदार लाटांमुळं ते तिथं पोहोचले. पोहता येत असल्यामुळं ते स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाले. ते पाल्मासच्या बेटावर पोहत गेले जिथं काहीही नव्हतं. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि तहान शमवण्यासाठी दोन लिंबू, कोळसा आणि समुद्रातील मीठाचं पाणी वापरून पाच काढले. जेव्हा ते बेटावर काहीतरी उपयुक्त शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना एक तंबू सापडला, जो मच्छिमारांनी तिथंच सोडला असावा, त्याच तंबूजवळ दोन लिंबू देखील सापडले, जो त्यांचा पाच दिवसांचा सर्वात मोठा आधार होता.

हेही वाचा – जाणून घ्या…पृथ्वीवरचं ‘असं’ एकमेव बेट, जिथं प्रत्येक पावलावर आहेत विषारी साप!

त्यांना कुणी वाचवलं?

मच्छिमारांनी सोडलेल्या तंबूमध्ये एक घोंगडी देखील होती, जी नेल्सनने हवेत हलवून मदत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. उडणारे ब्लँकेट पाहिल्यानंतरही त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचली नाही. हताश होऊन ते पुन्हा ‘ग्रुमारी बीच’कडे पोहू लागले. पण जेव्हा जेव्हा ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा जोरदार लाटा त्याला मागे ढकलत असत. त्यांना पाच दिवसांनी एक आशेचा किरण दिसला. काही लोक मोटरबोटीने त्या बेटावर आले. त्यानंतर त्यांनी आपला टी-शर्ट हवेत फिरवला, त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांना एकाच दिवसात डिस्चार्ज मिळाला. आता ते पूर्णपणे बरे आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment