Kolhapur Doctor Video : डॉक्टरांना उगाचं देवाचं रूप म्हटलं जात नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. एका डॉक्टरनं जागीच समजूतदारपणा दाखवून एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर व्हिडिओतील डॉक्टरांचे आभार लोक कौतुक करत आहेत व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या डॉक्टरांचं नाव अर्जुन अधिनायक आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अधिनायक त्यांच्या केबिनमध्ये बसले आहेत. त्यांच्यासमोर समोर दोन लोक बसले आहेत.
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की समोर बसलेली व्यक्ती आरामात बसण्यासाठी खुर्चीवर पाठ टेकवते आणि अचानक त्याची मान मागे जाते. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं दिसतं. डॉक्टर ताबडतोब त्यांची प्रकृती समजून घेतात आणि त्यांच्या जागेवरून उठतात आणि हळू हळू त्यांच्या छातीवर दाब देतात. हळुहळू रुग्ण पुन्हा शुद्धीत येतो आणि सामान्य होतो. डॉक्टरांनी दाखवून दिलं की वेळेवर योग्य उपचार केले तर रुग्ण कोणत्याही आजारातून बरा होऊ शकतो.
खरा की खोटा व्हिडिओ?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एका युजरनं लिहिलं, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी या व्यक्तीनं डॉक्टरांना इशारा दिला होता. या यूजरच्या कमेंटनंतर, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल की ही घटना सुरू होण्यापूर्वी ती व्यक्ती खरोखरच डॉक्टरकडं इशारा करते. कदाचित डॉक्टरांनी त्वरीत उपचार करण्याची पद्धत दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असावा.
This video shows an example of a real life hero living in our midst. Dr. Arjun Adnaik, one of the best cardiologists, from Kolhapur saving a patient's life. I applaud such honourable and virtuous heroes. pic.twitter.com/Gd9U2ubldJ
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) September 5, 2022
हेही वाचा – VIDEO : सलमान खानला प्यायला वेळ नाही; अर्धा भरलेला ग्लास ‘भाईजान’नं पँटच्या खिशात ठेवला..!
हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. निरोगी राहण्यासाठी, निरोगी हृदय असणं खूप महत्वाचे आहे. कारण जेव्हा हृदयात गडबड सुरू होते, तेव्हा त्या व्यक्तीला अनेक समस्या येऊ लागतात. सुरुवातीला रक्तदाब वाढणं, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल वाढणं अशा समस्या असू शकतात. त्याच वेळी, हृदयविकाराचा धोका देखील वेळेनुसार वाढतो. जेव्हा हृदयविकार होतो तेव्हा अनेकांना हृदयविकाराची लक्षणं जाणवू लागतात. काहींना एक-दोनदा हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
हृदयाला होणारा रक्तप्रवाह अवरोधित किंवा कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. कोरोनरी धमन्यांमध्ये वाढलेली चरबी आणि कोलेस्टेरॉल रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो. हृदयविकाराचा झटका देखील मृत्यूचं गंभीर कारण बनू शकते. त्यामुळं हृदयविकाराच्या झटक्याचे कोणतेही सामान्य लक्षण तुम्हाला जाणवत असले तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.