तो रोज 10 लिटर पाणी प्यायचा, डॉक्टरांना वाटलं त्याला मधुमेह असेल, पण…

WhatsApp Group

Man Drinking 10 Litres Water Per Day : पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कारण त्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. आपल्या शरीरात 50 टक्क्यांहून अधिक पाणी असते. प्रत्येक पेशी पाण्याने भरलेली असते. पेशी टिकून राहण्यासाठी आपण पाणी पीत राहणे आवश्यक आहे. डॉक्टर दररोज किमान 2-3 लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. उन्हाळ्याच्या हंगामात हे अधिक महत्वाचे आहे. पण कल्पना करा की एखादी व्यक्ती रोज 10 लिटर पाणी प्यायला लागली तर? तुम्ही म्हणाल की ते शरीरासाठी चांगले आहे. पण हे योग्य नाही. जास्त पाणी पिणे म्हणजे तुम्ही कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहात. साधारणपणे साखरेच्या रुग्णांना जास्त तहान लागते. यूकेचे रहिवासी जोनाथन प्लमर यांनाही हीच समस्या होती. तो रोज 10 लीटर पाणी प्यायचे. त्यांना मधुमेह असेल, असे डॉक्टरांना वाटत होते, मात्र जेव्हा वास्तव समोर आले तेव्हा सगळेच चक्रावून गेले. कारण त्यांनामधुमेह अजिबात नव्हता.

ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या जोनाथन प्लमर (Jonathan Plummer) यांनी आपली कथा डेली मेलशी शेअर केली आहे. ते म्हणाले, ”मला सतत तहान लागत होती. कितीही पाणी प्यायलो तरी माझी तहान शमली नाही. मी प्रत्येक क्षणी पाणी प्यायचो. सहसा पाणी शरीर स्वच्छ करते आणि तुम्हाला उत्साही वाटते, पण मला थकवा जाणवू लागला. मी नेहमीच सक्रिय व्यक्ती होतो. रग्बी आणि क्रिकेट नियमित खेळायचो. पण यामुळे मी काही करू शकलो नाही. एक दिवस मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हणाले की तुला मधुमेह असेल. कारण तेव्हाच खूप तहान लागते. मात्र जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. साखर तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. म्हणजेच मला मधुमेहाचा त्रास नव्हता.”

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोल महागले, वाचा तुमच्या शहरातील किमती

जोनाथन यांनी सांगितले की, एके दिवशी मी नियमित डोळ्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यानंतर डॉक्टरांना डोळ्यात काहीतरी दिसले आणि एमआरआय स्कॅनसाठी पाठवले. असे निष्पन्न झाले की मला माझ्या पिट्यूटरी ग्रंथीजवळ ब्रेन ट्यूमर आहे. वास्तविक, मेंदूमध्ये वाटाण्याच्या आकाराचा एक भाग असतो जो आपली तहान नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. यामुळे आपल्याला कळते, की शरीरातील पाणी कमी होत आहे आणि आपण पाणी प्यावे. पण जोनाथन यांच्या शरीरात ब्रेन ट्युमर झाल्यामुळे तिची यंत्रणा बिघडली आणि त्यांना रोज पाचपट पाणी पिण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे जोनाथन यांना अधिक तहान लागली होती.

जोनाथन म्हणाले, ”डॉक्टरांनी हे सांगताच मला धक्का बसला. रेडिओथेरपी 30 वेळा झाली. दीर्घ उपचार चालले आणि आज मी ट्यूमर मुक्त आहे. पूर्वी मला धावता येत नव्हते पण व्यायाम सुरू केला. योगासने करू लागलो. नियमितपणे धावणे आणि पोहणे सुरू केले. यानंतर वजनावर नियंत्रण मिळवता आले. आज मला काही अडचण नाही.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment