Lumpy Skin Disease : काय आहे हा लम्पी आजार? कसा पसरतो? कसा थांबवायचा? वाचा इथं!

WhatsApp Group

Lumpy Skin Disease : देशात गायींमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत तो रोखायचा कसा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तसेच, हा आजार एका गायीपासून दुसऱ्या गायीमध्ये कसा पसरतो हे जाणून घेणं खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपण आपल्या जनावरांना वाचवू शकू आणि संसर्गाचा प्रसार रोखू शकू. महाराष्ट्रातील गुरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागानं सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना लसीकरण तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की राज्यातील गुरांना लम्पी आजाराची मोफत लस दिली जाईल. या आजारामुळं राज्यात आतापर्यंत ४३ गुरांचा मृत्यू झाला आहे.

कसा पसरतो हा व्हायरस?

पशुवैद्य डॉ. अखिलेश पांडे यांनी सांगितलं, की हा आजार दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आला होता, जो काही वर्षांपूर्वी भारतात आला होता, परंतु यापूर्वी तो जीवघेणा नव्हता. यावेळी त्याचा प्रकार बदलला असून तो जीवघेणा ठरला आहे. या आजाराला थोडक्यात LSDV म्हणतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यात पसरतो. हा आजार Capri Poxvirus नावाच्या विषाणूमुळे होतो. तज्ज्ञांच्या मते, हा रोग डासांच्या चाव्यामुळं आणि रक्त शोषणाऱ्या कीटकांमधून गुरांमध्ये पसरतो. या रोगाविरूद्ध मानवांमध्ये जन्मजात प्रतिकारशक्ती आढळते, म्हणजेच हा त्या आजारांपैकी एक आहे जो मानवांना होऊ शकत नाही.

हेही वाचा – World Dairy Summit : ‘ती’ म्हैस इतकी खास का, जिचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी केलाय?

हा आजार आफ्रिकेत १९२९ मध्ये पहिल्यांदा आढळला होता. गेल्या काही वर्षांत हा रोग अनेक देशांतील प्राण्यांमध्ये पसरला आहे. २०१५ मध्ये तो तुर्की आणि ग्रीसमध्ये आणि २०१६ मध्ये रशियामध्ये पसरला. जुलै २०१९ मध्ये बांगलादेशमध्ये या विषाणूचा कहर दिसून आला. आता तो अनेक आशियाई देशांमध्ये पसरत आहे. भारतात, २०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये हा आजार दिसून आला.

लम्पी रोगाची लक्षणं

  • संसर्ग झालेल्या प्राण्यात ताप
  • जनावरांचं वजन कमी होणं
  • डोळ्यातून पाणी येणं
  • लाळ येणं
  • शरीरावर पुरळ येणं
  • दूध कमी देणं
  • भूक नसणं

लम्पी या आजारावर उपाय

  • गोठा स्वच्छ ठेवणं
  • डास दूर करण्यासाठी फवारणी करणं.
  • बाधित प्राण्याला लस देणं.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानं जनावरांना औषधे दिली जाऊ शकतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment