Commercial LPG Cylinder Price Hike : देशभरात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती सुधारल्या जातात. आजही त्यांच्या किमती अपडेट करण्यात आल्या आहेत. देशभरात पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 21 रुपयांनी वाढली आहे. तर घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत. आता राजधानी दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर 1,797.50 रुपयांना मिळणार आहे.
गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 103 रुपयांनी वाढल्या होत्या. या वाढीनंतर रेस्टॉरंट मालकांसह मिठाईवाल्यांना मोठा फटका बसला आहे. चला, जाणून घेऊया देशातील महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय आहेत?
महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत (Commercial LPG Cylinder Price Today)
राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1796.50 रुपयांवर पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये त्यांची किंमत 1775.50 रुपये होती.
कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,908 रुपये आहे. गेल्या महिन्यात त्यांची किंमत 1,885.50 रुपये होती.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढून 1,749 रुपये झाली आहे जी गेल्या महिन्यात 1,728 रुपये होती.
चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,968.50 रुपये आहे, तर ऑगस्टमध्ये त्याची किंमत 1,942 रुपये होती.
हेही वाचा – 1 डिसेंबर 2023 पासून बदलणार मोठे नियम! सिम कार्ड, बँक आणि UPI बाबत माहिती
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 डिसेंबर 2023 रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!