LPG Price Today : गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबर महिन्यातही सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही, म्हणजेच वाढत्या किमतीतून तुम्हाला दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही या महिन्यात एलपीजी सिलिंडरची किंमतही बुक करणार असाल तर त्याआधी तुमच्या शहरात १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत किती आहे ते तपासा.
IOCL ने जाहीर केले नवीन दर
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ११५.५० रुपयांनी कमी झाल्या होत्या. गेल्या ६ वेळा १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होताना दिसत आहे.
हेही वाचा – Chanakya Niti : लग्नानंतर पुरुष दुसरी स्त्री का शोधू लागतो? ‘ही’ आहेत प्रमुख ३ कारणं
गॅस सिलिंडरची किंमत तपासा
देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर १ डिसेंबर २०२२ रोजी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा दर १०५३ रुपये आहे. याशिवाय कोलकात्यात १०७९ रुपये, मुंबईत १०५२ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८ रुपये आहे. १४ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटच्या वेळी ६ ऑक्टोबर रोजी बदल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमती १५ रुपयांनी वाढल्या होत्या. तर यापूर्वी २२ मार्च रोजी दर ५० रुपयांनी वाढले होते.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत –
- दिल्ली – रु. १७४४
- मुंबई – रु. १६९६
- चेन्नई – रु. १८९१.५०
- कोलकाता – रु. १८४५.५०