फक्त ७५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर..! ‘ही’ कपंनी देतेय सेवा; लगेच करा बुकिंग!

WhatsApp Group

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्यानं वाढ होत असताना, तुम्हाला स्वस्त सिलिंडर खरेदी करण्याची संधी आहे. तुम्हीही गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतीसल, तर खाली दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारी तेल कंपनीनं सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात गॅस सिलेंडर घेऊ शकता. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला ७५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळत आहे.

सध्या देशभरात गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत १०५३ रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला ७५० रुपयांना म्हणजेच ३०० रुपयांनी स्वस्त सिलिंडर दिला जात आहे. इंडेननं ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरू केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त ७५० रुपये द्यावे लागतील. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकता. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला हा गॅस सिलिंडर मिळेल.

हेही वाचा – क्या बात है..! पंतप्रधान मोदींचा बर्थडे ठरणार खास; देशाला मिळणार ‘मोठं’ गिफ्ट!

कंपोझिट सिलिंडर म्हणजे काय?

कंपोझिट सिलिंडर नियमित सिलिंडरपेक्षा वजनानं हलका असतो. यामध्ये तुम्हाला १० किलो गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते पारदर्शक आहेत. इंडेन सध्या २८ शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. लवकरच या सुविधेचा विस्तार करण्यात येणार असून हे सिलिंडर सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनी सध्या काम करत आहे.

सिलिंडरचे नवे दर

  • दिल्ली – ७५० रुपये
  • मुंबई – ७५० रुपये
  • कोलकाता – ७६५ रुपये
  • चेन्नई – ७६१ रुपये
  • लखनऊ – ७७७ रुपये

१४.२ किलो सिलिंडरचा दर

  • दिल्ली – १०५३ रुपये
  • मुंबई – १०५२.५ रुपये
  • चेन्नई – १०६८.५ रुपये
  • कोलकाता – १०७९ रुपये
  • लखनऊ – १०९०.५ रुपये

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment