1 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांचा खिसा हलका होणार आहे. तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) दरात वाढ केली आहे. CNBC-TV18 च्या अहवालानुसार, तेल विपणन कंपन्यांनी (OMC) 1 फेब्रुवारी रोजी 19 किलो व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत, ज्या आजपासून लागू झाल्या आहेत.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीसह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,755.5 रुपयांवरून 1,769.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा – हनुमानावर रागावून बसलेत ‘या’ गावातील लोक, आजही त्याची पूजा करत नाहीत!
वाढत्या किमतीचा काय परिणाम होईल?
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर हॉटेलचे खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त बिल भरावे लागेल. मात्र, याचा घराच्या किचन बजेटवर कोणताही परिणाम होणार नाही. हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा तसेच विक्री राखण्यासाठी पुन्हा किमतीत फेरबदल करावे लागतील.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!