LPG Cylinder Price In Marathi : नवीन महिना सुरू होताच गॅसचे दर वाढले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 101 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. चांगली बाब म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कमर्शिअल गॅसच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, मिठाई आणि इतर गोष्टींच्या किमती वाढू शकतात. गेल्या 32 दिवसांत कमर्शिअल गॅसच्या किमतीत सुमारे 310 रुपयांनी वाढ झाली आहे.
19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 1833 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, यासाठी तुम्हाला कोलकातामध्ये 1943 रुपये, मुंबईमध्ये 1785 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपये द्यावे लागतील. गेल्या महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे पाच आठवड्यात गॅसच्या किमतीत 300 रुपयांनी वाढ झाली आहे.
LPG गॅस पुन्हा महाग
गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ झाली होती. गेल्या महिन्यात कोलकात्यात एलपीजी गॅसची किंमत 203.50 रुपयांनी वाढली होती. यावेळी 103.50 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच 31 दिवसांत एलपीजीच्या किमतीत 307 रुपयांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा – जळत्या चितेमधून बाहेर पडू लागल्या 500-500 च्या नोटा, नक्की काय घडलं?
यावेळी घरगुती एलपीजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. 30 ऑगस्ट रोजी एलपीजीच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये आणि मुंबईत 902.5 रुपये आहे. चेन्नईमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 918.5 रुपये आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!