Long Lasting Makeup for the Summer : चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकजण चेहऱ्यावर मेकअप करतात. मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे असते. उन्हाळा मध्ये घाम आणि हानिकारक किरणं तुमचा मेकअप खराब करतात. याशिवाय या गोष्टीचा तुमच्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसते. तुमच्या त्वचेवर टॅनिंग दिसून येते. मुरुमांची समस्या सुरू होते.
घामामुळे मेकअप त्वचेवर स्निग्ध दिसू लागतो. यामुळे तुमचा चेहरा खूपच खराब दिसतो. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात मेकअप टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता ते जाणून घेऊया.
लाइट मेकअप
उन्हाळ्यासाठी तुम्ही हलका मेकअप निवडा. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, प्राइमर आणि फाउंडेशन निवडता तेव्हा बेस लाइट ठेवा. खूप क्रीमी मेकअप टाळा. यामुळे त्वचेला घाम आला की त्वचा ऑईली दिसू लागते. अशावेळी जेल आधारित मेकअप वस्तू निवडू शकता.
एसपीएफ
मल्टीफंक्शनल उत्पादने वापरा. मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि एसपीएफ म्हणूनही काम करणारी उत्पादने वापरा. घामामुळे त्वचेवर अतिशय विचित्र थर तयार होतो म्हणूनच या गोष्टीची काळजी घ्या.
हेही वाचा – Parle G Biscuit Price : अमेरिका आणि पाकिस्तान मध्ये कितीला मिळते ‘पार्ले-जी’ बिस्किट?
वॉटरफ्रूफ मेकअप
वॉटरफ्रूफ उत्पादनांचा वापर करा. घाम किंवा सूर्यप्रकाशामुळे ही उत्पादने त्वचेवर पसरत नाहीत. घाम आणि सूर्यप्रकाशातही तुमची त्वचा टवटवीत दिसते. तुम्ही बाहेर गेल्यावरही हे मेकअप कायम राहतो.
फिनिशिंग
उन्हाळ्यात त्वचेसाठी अशी सौंदर्य उत्पादने निवडा, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक फिनिशिंग दिसेल.
लूज पावडर
त्वचेवर बराच काळ मेकअप ठेवण्यासाठी तुम्ही लूज पावडर आणि सेटिंग स्प्रे वापरू शकता. यामुळे तुमचा मेकअप बराच काळ त्वचेमध्ये लॉक इन राहतो. यामुळे तुमचा मेकअप ब्लर देखील दिसत नाही. मेकअप जास्त काळ टिकवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!