दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला आराम मिळावा यासाठी लोकांना गरम पाण्याने अंघोळ करतात. थंडीच्या मोसमातही बहुतेक लोक गरम पाण्यानेच आंघोळ करतात. पण हे करताना तुम्ही तुमचा चेहराही गरम पाण्याने धुता का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही तुमची ही सवय ताबडतोब बदलली पाहिजे. तुमची ही सवय तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे करू शकते.
चेहऱ्याची त्वचा शरीराच्या त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील आणि नाजूक असते. अशा परिस्थितीत गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेच्या पेशींना नुकसान होऊ शकते.
हेही वाचा – पीएम किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता अकाऊंटमध्ये आला की नाही? असं चेक करा!
गरम पाण्याने चेहरा धुतल्याचे परिणाम
पुरळ समस्या
गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील रक्ताभिसरण वाढू शकते ज्यामुळे मुरुम आणि त्वचेची इतर सूज वाढू शकते.
कोरडी त्वचा
गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील आवश्यक नैसर्गिक तेले नष्ट होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊन क्रॅक होऊ शकते. कोरड्या त्वचेमुळे त्वचेवर तीव्र खाज सुटते आणि सोरायसिसची समस्या देखील उद्भवू शकते.
काळे डाग
आपल्या त्वचेसाठी रुम टेम्परेचरचे पाणी योग्य असते. बाहेरील उष्ण वातावरणातून आल्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुतल्यास लहान काळे डाग पडू शकतात. हे डाग मोठेही होऊ शकतात. गरम पाणी तुमच्या त्वचेच्या बॅरियरला हानी पोहोचवते. यामुळे अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्वचेवर काळे डाग, अकाली सुरकुत्या आणि पुरळ उठणे अशा समस्या असू शकतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!