Freezer In Fridge : रेफ्रिजरेटर हे स्वयंपाकघरातील उपकरणांपैकी एक आहे. उन्हाळ्यात, अन्नपदार्थ खराब होण्यापासून रोखण्यासाठी आणि गोष्टी थंड करण्यासाठी याचा वापर केला जातो. आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरात फ्रिज दिसतील. गरजेनुसार कंपन्या वेगवेगळ्या क्षमतेचे फ्रिज बनवतात. घरात वापरल्या जाणार्या बहुतेक रेफ्रिजरेटरमध्ये फ्रिजर वरती असल्याचे तुम्ही पाहिले असेलच. पण असं का असतं याचा कधी विचार केला आहे का? फ्रिजर फ्रिजच्या तळाशी का ठेवला जात नाही? खरे तर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. फ्रिजमध्ये फ्रिजर वरच्या दिशेने का असतो ते जाणून घेऊया.
फ्रिजर वर का असतो?
गरम हवा हलकी असते आणि थंड हवा जड असते. फ्रिजमधील फ्रिजर कंपार्टमेंटचे तापमान सर्वात कमी राहते. त्यामुळे आजूबाजूची हवाही थंड राहते. आता थंड हवा जड असल्याने. म्हणूनच ती खाली येते आणि खाली गरम हवा किंवा म्हणा की वरीलपेक्षा किंचित जास्त तापमान असलेली हलकी हवा वर जाते.
हेही वाचा – बिग न्यूज..! समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल; आर्यन खानप्रकरणात ‘इतके’ कोटी मागितले!
ही गरम हवा वर जाते आणि फ्रिजरवर आदळते आणि पुन्हा थंड होते. जेव्हा ती थंड होते, तेव्हा ती पुन्हा खाली येते आणि खाली असलेली गरम हवा बदलते आणि परत वर पाठवते. अशा प्रकारे हे चक्र चालू राहते आणि संपूर्ण फ्रिजमध्ये तापमान योग्य राहते.
फ्रिजर खाली असेल तर…
जर फ्रिजर तळाशी ठेवला तर जड असलेली थंड हवा तळाशी राहील आणि वरची उबदार हवा वरच्या बाजूला राहील. या कॉम्बिनेशनमध्ये फ्िजमध्ये योग्य कूलिंग होत नाही. फ्रिजर वरती ठेवण्याचा एक फायदा म्हणजे फ्रिज बंद केल्यावर, फ्रिजरला हवा मारून खाली गार झाल्यावर खाली येण्याच्या चक्रामुळे संपूर्ण फ्रिजमध्ये योग्य कूलिंग बॅलन्स राखला जातो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!