दररोज आंघोळ करणे शरिरासाठी हानिकारक! जाणून घ्या विज्ञान काय सांगते

WhatsApp Group

भारत एक असा देश आहे जिथे लोक दररोज आंघोळ (Bathing Every Day) करण्यावर विश्वास ठेवतात. कडाक्याच्या थंडीतही लोक अंघोळ करायला चुकत नाहीत. ही आपली सवय असते. भारतीय संस्कृतीतही आंघोळीला शुद्धतेशी जोडते आणि त्याला वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टीकोन देते. आपल्या संस्कृतीत आंघोळ ही पवित्र क्रिया आहे. पण रोज आंघोळ केल्याने नुकसान होऊ शकते, असे विज्ञान सांगते.

जगातील सर्वाधिक आंघोळ करणाऱ्यांमध्ये भारतातील लोकांची गणना होते. धार्मिक श्रद्धेमुळे, सरासरी भारतीय जवळजवळ दररोज आंघोळ करतो. कारण त्यांना असे वाटते की असे केल्याने त्यांचे शरीर आणि मन शुद्ध होते. पुष्कळ भारतीय दररोज आंघोळ करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की पूजेसाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. पण विज्ञान काही वेगळेच सांगते.

विज्ञानाचा असा विश्वास, की जर तुम्ही दररोज आंघोळ करत असाल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहात आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील कमी करत आहात. जगभरातील त्वचा तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही हिवाळ्यात दररोज आंघोळ करत नसाल तर चांगली गोष्ट आहे. जास्त आंघोळ केल्याने आपल्या त्वचेला हानी पोहोचते. उन्हाळ्यात दररोज आंघोळ करणे सर्वांनाच आवडत असले, तरी हिवाळ्यात आंघोळ करणे एकप्रकारे टाळावेच.

अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता चांगली असते. जर तुम्ही व्यायामशाळेत जात नसाल, तुम्हाला वारंवार घाम येत नसेल, किंवा तुम्ही धुळीत जात नसाल, तर तुम्हाला दररोज आंघोळ करणे आवश्यक नाही.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही नुकसान

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केली तर फायदा होण्यापेक्षा जास्त नुकसान होते. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे शरीरातील नैसर्गिक तेल निघून जाते. शरीरातील हे नैसर्गिक तेल आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील काम करते. विज्ञानानुसार, हे तेल तुम्हाला मॉइश्चराइज आणि संरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

हेही वाचा – ‘त्याने’ 2024 वर्षाची अशी भविष्यवाणी केलीय आणि सर्वांना टेन्शन आलंय!

जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी (वॉशिंग्टन डीसी, यूएस) येथील प्राध्यापकांच्या मते, आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया देखील निघून जातात. हे बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात. त्यामुळे हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच आंघोळ करावी. अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ उटाहच्या जेनेटिक्स सायन्स सेंटरच्या अभ्यासानुसार, “रोज अंघोळ केल्याने आपल्या मानवी शरीराच्या संरक्षण यंत्रणेला हानी पोहोचते. जंतू आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता कमकुवत होते. अन्न पचवण्याची क्षमता आणि त्यातून जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक वेगळे करण्याची क्षमता देखील प्रभावित होते.”

दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही तुमच्या नखांना त्रास होतो. आंघोळ करताना तुमची नखे पाणी शोषून घेतात. मग ती मऊ होतात आणि तुटतात. कोलंबिया विद्यापीठातील एका अभ्यासानुसार, रोज अंघोळ केल्याने त्वचा कोरडी आणि कमकुवत होते. त्यामुळे संसर्गाचा धोका झपाट्याने वाढतो. म्हणूनच दररोज आंघोळ करू नये.

आंघोळीची सवय एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती, तापमान, हवामान, लिंग आणि सामाजिक दबाव यावर अधिक अवलंबून असते. भारतात धार्मिक कारणांव्यतिरिक्त, पाण्याची उपलब्धता हे देखील एक मोठे कारण आहे. पण हेही खरे आहे की भारतात अनेक वेळा आंघोळीचे, कारण केवळ सामाजिक दबाव असते. भारत, जपान आणि इंडोनेशियाचे लोक आंघोळीच्या बाबतीत जगातील अव्वल देशांमध्ये खूप पुढे असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांतील अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की दररोज आंघोळ करणे केवळ पाण्याचा अपव्ययच नाही तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही हानिकारक आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment