Words Do Most People Speak Just Before Death : माणसाला मृत्यू एक ना एक दिवस यायचाच आहे. मृत्यूला सामोरे जाताना तुमच्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येईल? याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नसेल. मात्र, अमेरिकेतील काही डॉक्टरांनी यावर एक खळबळजनक खुलासा केला आहे आणि सांगितले आहे की बहुतेक लोक मरण्यापूर्वी कोणते दोन शब्द वापरतात.
डेली मेलच्या वृत्तानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या डॉ मिना चांग यांनी सांगितले की, बहुतेक रुग्ण म्हणतात: ‘मला कोणताही पश्चाताप नाही’. हॉस्पिस नर्स ज्युली मॅकफॅडन म्हणाल्या की वृद्ध लोक सहसा कुटुंबापासून विभक्त झाल्याबद्दल किंवा जास्त काम केल्याबद्दल खेद व्यक्त करतात
डॉ. चांग यांच्या मते, अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते. त्यांना ‘आय लव्ह यू’ म्हणतात. माफी मागतात आणि मी तुला माफ केलं, असे म्हणतात. काही लोक ‘अलविदा’ असे शब्दही वापरतात. डॉक्टर चांग म्हणाले, ”रुग्णांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणे, त्यांना आधार देणे हा खूप खास क्षण असतो. आम्ही त्या क्षणाचा एक भाग बनण्यासाठी भाग्यवान आहोत.”
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा..! अयोध्येत उभारणार बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन
लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील नर्स ज्युली मॅकफॅडन यांनी सात वर्षांहून अधिक काळ हॉस्पीस केअरमध्ये काम केले आहे आणि 15 वर्षांहून अधिक काळ त्या नर्स आहे. जुली त्यांचे अनुभव Tiktok वर शेअर करतात. त्यांचे आता 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि सुमारे 13 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ज्युली यांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी, त्यांना त्यांच्या बहुतेक रुग्णांच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल झाल्याचे लक्षात आले. याशिवाय त्वचेचा रंग बदलणे, ताप येणे, जवळच्या आणि प्रिय व्यक्तींची नावे वारंवार येणे अशी लक्षणेही दिसून आली. दुसर्या व्हिडिओमध्ये, ज्युली म्हणतात की मरण्यापूर्वी, त्यांना त्यांच्या बहुतेक रुग्णांना सावली दिसू लागते. सावलीत, त्यांना त्यांचे जवळचे मृत लोक दिसतात.