वाइन, व्हिस्की, रम, बिअर…यापैकी सर्वात जास्त धोकादायक दारू कोणती?

WhatsApp Group

भारतासह जगभरात आनंदोत्सव साजरा करायचा म्हटला, की दारु पार्ट्या केल्या जातात. यात प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार वाइन, व्हिस्की, रम किंवा बिअर यांचा समावेश होतो. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार दारुच्या प्रकाराचां आग्रह धरतात. व्हिस्की, रम किंवा बिअर यात दारू म्हणजेच अल्कोहोलच्या प्रमाणावरून त्याची तीव्रता कळते. हे प्रमाण जास्त असेल तर ती धोकादायक (Most Harm Alcohol In Marathi) मानली जाते.

वाइन

वाइन हा एक प्रकारचा आंबलेल्या द्राक्षाचा रस असतो. वाइन लाल आणि काळ्या द्राक्षांपासून तयार करतात. एक किंवा दोन आठवडे ओक बॅरल्समध्ये ठेचलेली द्राक्षे आंबवली जातात, तेव्हा रेड वाइन तयार केली जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण 14 टक्क्यांपर्यंत असू शकते.

व्हिस्की

व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते, जे 30 टक्के ते 65 टक्के अल्कोहोल असते. व्हिस्की वेगवेगळ्या ब्रँडमध्ये विविध अल्कोहोल सामग्रीसह उपलब्ध आहे. ती तयार करण्यासाठी, गहू आणि बार्ली आंबवले जातात.

हेही वाचा – World Diabetes Day : घरात सर्वांना मधुमेह असेल, तर तुम्ही काळजी कशी घ्याल?

बिअर

बिअऱ तयार करण्यासाठी फळांचा आणि संपूर्ण धान्याचा रस वापरला जातो. त्यात अल्कोहोलचे प्रमाण खूपच कमी म्हणजे 4 ते 8 टक्के असते.

रम

थंड हवामानात, लोक सहसा रम पसंत करतात. हे एक डिस्टिल्ड पेय आहे, जे आंबलेल्या उसापासून बनवले जाते आणि त्यात 40 टक्के अल्कोहोल असू शकते. तथापि, अनेक ओव्हरप्रूफ रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण 60-70 टक्के इतके असू शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment