पेप्सीला ‘Pepsi’ का म्हणतात माहितीये? वाचा या फेमस सॉफ्ट ड्रिंकची कहाणी!

WhatsApp Group

काहीजण Sprite पिणारे असतात, काहींना Thumbs Up आवडतं, तक काहींना Pepsi. यापैकी पेप्सीची टॅगलाईन बहुतेकांना पाठ असते. त्याच्या जाहिराती अनेक ठिकाणी आपण बघतो, ऐकतो. पण पेप्सीचे (Pepsi Story In Marathi) पहिले नाव काय होते हे तुम्हाला माहितीये का? ती पहिली कुणी बनवली?

पेप्सीला पेप्सी नाव देण्याआधी त्याला ‘ब्रॅड ड्रिंक’ म्हटले जायचे. 1893 मध्ये फार्मासिस्ट कॅलेब ब्रॅडम यांनी हे सॉफ्ट ड्रिंक तयार केले होते. पचनास मदत करणारे पेय म्हणून ही बाजारात आणली गेली. यानंतर, 1898 मध्ये ते पेप्सी-कोला म्हणून ओळखले जाऊ लागले आणि 1961 मध्ये त्याला फक्त पेप्सी करण्यात आले. आता 2023 पर्यंत, पेप्ली हे कोका-कोला नंतरचे दुसरे सर्वात लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक बनले आहे.

पेप्सी शब्द आला कुठून?

‘पेप्सी’ हा शब्द कुठून आला हे फार कमी लोकांना माहिती आहे. पेप्सी हे नाव ‘dyspepsia’ या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ इनडाइजेशन असा आहे. यावरून स्पष्ट होते की ‘पेप्सी’ म्हणजे डायजेशन.

कॅलेब प्रथम अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे असलेल्या त्याच्या औषधांच्या दुकानात सोडा फाऊंटेन चालवत असे, जिथे ते त्यांनी बनवलेले पेय विकत असे. त्यांनी विकलेले सर्वात लोकप्रिय फिझ म्हणजे ब्रॅड ड्रिंक, जो साखर, पाणी, कारमेल, लिंबू तेल, कोला नट, जायफळ आणि इतर पदार्थांच्या मिश्रणापासून बनवलेला सोडा होता. त्याची चांगली विक्री होऊ लागली.

1898 मध्ये कॅलेब यांनी त्याला पेप्सी-कोलामध्ये बदलले आणि 1903 पर्यंत सोडा सिरप संपूर्ण नॉर्थ कॅरोलिनामध्ये फार्मसीमध्ये विकले जाऊ लागले. पेप्सी विशेषतः पचन सुधारण्यासाठी तयार केली गेली होती. आणि नंतर कोला देखील त्याच्या नावातून काढून टाकण्यात आले जेणेकरून पेयाच्या आरोग्य फायद्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. ‘Exhilarating, Invigorating, Aids Digestion’, असे पेप्सीचे पहिले स्लोगन होते.

हेही वाचा – उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांनी 16 दिवस काय काय केलं?

अल्पावधीतच लोकांनी कॅलेब यांच्या या सॉफ्ट ड्रिंकमध्ये खूप रस दाखवला. त्यामुळे प्रोत्साहित होऊन कॅलेब यांनी आपली इतर सर्व कामे सोडून या सॉफ्ट ड्रिंकमध्ये लक्ष घातले. त्यांनी 1902 मध्ये पेप्सी-कोला कंपनीच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला. आता ही कंपनी पेप्सिको म्हणून ओळखली जाते आणि ती जगभर विकली जाते. आज सर्वत्र तुम्हाला पेप्सीच्या जाहिराती सर्वत्र पाहायला मिळतील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment