Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वेगाने वाढ होत आहे. बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली. चांदीच्या किमतीनेही नवा सर्वकालीन विक्रम केला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून दिल्लीत 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रम नोंदवला, तर चांदीने 200 रुपयांच्या वाढीसह 84,700 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम नोंदवला. मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा भाव 71,840 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
सात दिवसांत सोने 4500 रुपयांनी महागले
गेल्या सात दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 7 दिवसांत सोन्याच्या दरात 4580 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीच्या किमती 7973 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढल्या आहेत.
एक्स्पर्ट काय म्हणतात?
एक्स्पर्ट म्हणतात की, परदेशी बाजारात सोने खरेदीचा जोर आहे. अशा स्थितीत बुधवारी दिल्लीच्या बाजारात 24 कॅरेट सोने 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मंगळवारच्या तुलनेत प्रति औंस 6 डॉलरची वाढ होऊन तो प्रति औंस 2,356 डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी कायम राहणार आहे.
हेही वाचा – Home Loan घेतलंय? EMI भरताना अडचणी येतायत? ‘या’ स्मार्ट ट्रिक्स येतील कामी!
सोन्याचा भाव 1 लाखाच्या पुढे?
सोन्याच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा बेंचमार्क ओलांडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आत्तापर्यंतच्या अहवालांनुसार, गोल्ड लोन व्यवसायातील दिग्गज मुथूट फायनान्सचा अंदाज आहे की 2029 पर्यंत सोन्याची किंमत 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त होईल. मुथूट यांनी 2028 मध्ये सोन्याचा भाव 92,739 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा