International Friendship Day 2022 : फ्रेंडशिप डे उगाच साजरा नाही करत! त्यालाही एक इतिहास आहे…

WhatsApp Group

मुंबई : आपल्याकडं फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. याची सुरुवात १९५८ पासून झाली. या दिवशी आपण मैत्री साजरी करतो. मैत्रीचं नातं हे सर्वात सुंदर आणि महत्त्वाचं नातं मानलं जातं. बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही तितके आनंदी राहू शकत नाहीत जितके ते आनंदी मित्रांसोबत असतात. या दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. प्रत्येकजण हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करू शकतो.
मैत्री हे एक बंधन आहे जे लोक कायमचे जपतात, मग त्यांचे वय काहीही असो. जर आपण आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाबद्दल बोललो, तर तो दरवर्षी ३० जुलै रोजी साजरा केला जातो. पण भारत, मलेशिया, यूएई, बांगलादेश यांसारख्या काही देशांमध्ये हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. तो का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा इतिहास

१९५८ मध्ये पॅराग्वे येथे आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची सुरुवात झाली. त्याची उत्पत्ती हॉलमार्क कार्डपासून झाली होती. या संस्मरणीय दिवसाची सुरुवात हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी १९३० मध्ये केली होती. मित्रांसाठी एक खास दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची कल्पना त्यांनी मांडली जेव्हा लोक त्यांची मैत्री साजरे करू शकतील आणि नातेसंबंधांचा आदर करू शकतील. नंतर, विनी द पूह यांना १९८८ मध्ये युनायटेड नेशन्सनं मैत्रीचं राजदूत बनवलं.

हेही वाचा – CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच मॅचमध्ये तुटला महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड!

संयुक्त राष्ट्र संघानं ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. मैत्री वाढवून शांततेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी संघटना वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडनं हा दिवस प्रथम प्रस्तावित केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या ६५व्या आमसभेनं २०११ मध्ये औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन स्वीकारला.

भारतात फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो?

भारत आणि बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यावर्षी ७ ऑगस्ट २०२२ रोजी भारतात फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस त्यांच्या मित्रांसाठी खास बनवण्यासाठी लोक अनेक प्रकारे तयारी करतात.

मैत्री म्हणजे काय?

आई-वडील आणि कुटुंबासोबतचे तुमचं नातं जन्मत:च जोडलं जातं. पण मैत्री हे असं नातं आहे, जे लोक पहिल्यांदाच स्वतःशी बनवतात. तुमच्या भावनांवर आधारित हे नातं असतं. बालपणात एक मूल दुसऱ्या मुलाशी आपोआप संबंध जोडतं, त्याच्याशी खेळायला जातं. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडते त्यामुळे ते रोज एकमेकांशी खेळू लागतात. ती म्हणजे मैत्री. तीच भावना लोकांमध्ये मोठी झाल्यावरही दिसून येते. घर-परिसरापासून ते शाळा-कॉलेज-ऑफिसपर्यंत एखाद्या चांगल्या मित्राची साथ मिळते. तुम्ही तुमचं मन मित्रासोबत शेअर करता. त्याच्यावर विश्वास ठेवता, आपली स्वप्नं, रहस्यं शेअर करता. हीच मैत्री असते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment