Jio Recharge Plan : देशात अनेक दूरसंचार कंपन्या आहेत. या खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम प्लॅन आणले आहेत. आता जिओने एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन आणला आहे. यामध्ये तुम्हाला अधिक काळ वैधता मिळते. याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी जिओच्या या प्लॅनची तुलना Airtel आणि Vodafone Idea च्या प्लॅनशी करणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर.
Jio चा ३९५ रुपयांचा प्लॅन
जिओच्या ३९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ६ GB डेटासह ८४ दिवसांची वैधता दिली जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या वैधतेदरम्यान तुम्हाला १००० एसएमएस मिळू शकतात. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर जिओअॅप्सचा मोफत प्रवेशही दिला जात आहे.
Airtel चा ३९९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या ३९९ च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता दिली जाते. यामध्ये ग्राहकांना दररोज २५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर ते अमर्यादित आहे. दररोज १०० एसएमएस करू शकता. इतर वैशिष्ट्यांमध्ये FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून, फ्री विंक म्युझिक यांचा समावेश आहे.
हेही वाचा – 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी..! ‘या’ दिवशी खात्यात येणार २ लाख; मिळणार DA ची थकबाकी
Vodafone Idea चा ३९९ रुपयांचा प्लॅन
व्होडाफोनचा हा प्लॅन २८ दिवसांची वैधता देतो. यामध्ये तुम्हाला एकूण ७५ जीबी डेटा दिला जातो. तुम्ही दररोज २.५ जीबी डेटा वापरू शकता. तेथे कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय १०० एसएमएस देखील करू शकतात. इतर फायद्यांमध्ये ३ महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार सदस्यत्व आणि बरेच काही समाविष्ट आहे.