Jio Diwali Offer 2022 : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने पुन्हा एकदा एक मोठी घोषणा केली आहे, अनेक महिन्यांपासून लोकांना मोफत इंटरनेट सेवा पुरवत आहे. Jio ने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘JioFiber डबल फेस्टिव्हल बोनान्झा’ ऑफर लाँच केली आहे. या मर्यादित कालावधीच्या ऑफर अंतर्गत, JioFiber सदस्यांना निवडक प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर १५ दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड इंटरनेट सुविधा दिली जाईल. तसेच, १००% मूल्य देखील व्हाउचरसह परत केले जाईल.
Jio कंपनीने म्हटले आहे की जे वापरकर्ते १८ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान JioFiber चे नवीन कनेक्शन घेतात त्यांनाच नवीन ऑफरचा लाभ मिळेल. या ग्राहकांना ५९९ रुपये किंवा ८९९ रुपयांच्या प्लॅनसह सहा महिन्यांचा रिचार्ज करावा लागेल. यानंतर १५ दिवस मोफत इंटरनेट सेवेशिवाय इतर फायदेही दिले जात आहेत. डबल फेस्टिव्हल बोनान्झा ऑफरमध्ये नवीन JioFiber कनेक्शन घेणार्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी ५९९ रुपये किंवा ८९९ रुपयेचा प्लॅन रिचार्ज करावा लागेल. असे केल्याने त्यांना दोन अतिरिक्त फायदे मिळतील. प्रथम, त्यांना १५ दिवसांसाठी अतिरिक्त हाय-स्पीड इंटरनेट मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांना १०० टक्के मूल्य परत देखील दिले जाईल.
हेही वाचा – “गावात आल्यानंतर…”, बापर्डे ग्रामपंचायतीचं काम पाहून भारावली राज्यस्तरीय समिती!
Celebrate this festive season with Jio Double Festival Bonanza.
Get 100% value back with extra 15 days. Offer valid from 18th October to 28th October.
Get JioFiber: https://t.co/A0Cly2YIdt#WithLoveFromJio #FestiveOffer #JioFiber #Diwali pic.twitter.com/lgVDZoyCbw— Reliance Jio (@reliancejio) October 19, 2022
५९९ रुपयांमध्ये काय मिळेल?
ग्राहकांना हा प्लॅन किमान ६ महिन्यांसाठी खरेदी करावा लागेल. यासाठी यूजर्सला ४२४१ रुपये द्यावे लागतील. यामध्ये प्लॅनसाठी ३५९४ रुपये, तर ६४७ रुपये जीएसटी भरावे लागतील. नवीन ग्राहकांना या प्लॅनसह ४५०० रुपयांचे व्हाउचर मिळतील. यामध्ये AJio, Reliance Digital आणि NetMeds कडून १००० रुपयांचे व्हाउचर उपलब्ध असतील. त्याच वेळी, Ixigo साठी १५०० रुपयांचे व्हाउचर उपलब्ध असेल. याशिवाय, या सर्व ग्राहकांना १५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. म्हणजेच यूजर्सला हा रिचार्ज प्लान ६ महिन्यांसाठी घ्यावा लागेल. या प्लानमध्ये यूजर्सना ३० Mbps च्या स्पीडने डेटा मिळेल. याशिवाय, १४ OTT प्लॅटफॉर्म आणि ५५० हून अधिक ऑन-डिमांड चॅनेलवर प्रवेश उपलब्ध असेल.