Viral Video : चहापासून बनवलं आईस्क्रीम..! तुम्हाला कशी वाटली आयडिया? पाहा

WhatsApp Group

Ice Cream Made From Tea : भारतात करोडो लोक चहा प्रेमी आहेत. काहीजण चहाच्या बाबतीत इतके संवेदनशील असतात की, कोणी चहाबद्दल वाईट बोलले की त्यांना ऐकवले जाते. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. कारण हा व्हिडिओ एका चहापासून बनवलेल्या आईस्क्रीमचा आहे.

काही दिवसांपूर्वी Mi_nashikkar_ या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चहापासून आईस्क्रीम बनवताना दिसत आहे. याचे नाव चाय आइस्क्रीम आहे. तुम्हालाही हे कॉम्बिनेशन विचित्र वाटत असेल. एक माणूस कूलिंग मशीनवर चहाचा कप ओततो. त्यानंतर तो त्यात दूध ओततो. काही सेकंदात, चहा आणि दूध गोठण्यास सुरवात होते. मग तो त्यात चॉकलेट क्रीम घालतो आणि खूप स्मॅश करतो जेणेकरून त्याची पेस्ट बनते. आणखी क्रीम घातल्यानंतर तो तो पदार्थ आणखी बारीक करून मशीनवर पसरवतो. त्यानंतर, तो त्याचे रोलमध्ये रूपांतर करतो आणि प्लेटवर सजवून खायला देतो.

https://www.facebook.com/watch/?v=1307053023373427&t=0

हेही वाचा – Forbes : टॉप २० आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर..! ३ भारतीयांचा दबदबा

या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजकाल लोक पैसे कमवण्यासाठी काहीही बनवतात आणि विकतात, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment