How will 5G be better than 4G : दूरसंचार उद्योगाचा एक कार्यक्रम, इंडिया मोबाइल काँग्रेस २०२२ (IMC 2022) च्या सहाव्या एडिशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवा सुरू केली. तुम्हाला माहिती आहे का 5G तुमच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतो? या सेवेची खासियत काय आहे आणि ती 4G पेक्षा कशी चांगली आहे. सर्वप्रथम, हे जाणून घ्या की 5G सेवा ही मोबाइल नेटवर्कची पाचवी पिढी आहे. 5G चा इंटरनेट स्पीड 4G नेटवर्क पेक्षा १०० पट जास्त आहे.
दोन्हीचे मुख्य म्हणजे मोबाइल नेटवर्किंग समान आहे परंतु वेग जास्त आहे. तुमचा फोन आणि टॉवरमधील सिग्नलचा वेग जास्त असेल. हे तुमच्या डेटाचे प्रमाण देखील सुधारेल.
5G चा वेग किती असेल?
मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडिओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.
एअरटेल वाराणसीतून 5G आणि अहमदाबादमधील एका गावात जिओ सुरू करणार आहे. कार्यक्रमादरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5G सेवा Jio सुरू केली जाईल.
In a short while from now, at 10 AM the Indian Mobile Congress commences where India’s 5G revolution is all set to be launched. I specially urge those from the tech world, my young friends and the StartUp world to join this special programme. https://t.co/0JVJxMQEFw https://t.co/81gTtZEwz2
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2022
हेही वाचा – ‘या’ ठिकाणी तिसरी मुंबई होणार…! फडणवीसांनी सांगितला मास्टरप्लॅन; धारावीचाही पुनर्विकास!
अलीकडेच, भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या सर्वात मोठ्या लिलावात, भारत सरकारला १.५ लाख कोटी रुपयांची विक्रमी बोली मिळाली. यामध्ये मुकेश अंबानींच्या जिओने ८८,०७८ कोटी रुपयांची बोली लावून लिलावात होणाऱ्या जवळपास निम्म्या एअरवेव्ह घेतल्या. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासारख्या मेट्रो शहरांमध्ये दिवाळीपर्यंत कंपन्या लवकरच त्यांच्या 5G नेटवर्कवर हाय-स्पीड मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करू शकतात.
किंमत किती असू शकते?
एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडियाने सध्या हे सांगितलेले, नाही की ग्राहकांना 5G सेवांसाठी किती शुल्क द्यावे लागेल. तथापि, आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की 5G चे दर 4G च्या प्रीपेड प्लॅनसारखेच असतील. 5G लाँच केल्यानंतर, ग्राहक स्वतःसाठी हा प्लॅन निवडू शकतात.