भारतातील प्रत्येक सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे. मिठाईशिवाय आपण कोणताही सण सहसा साजरा करत नाही. त्यात काजू कतली म्हटली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे जेव्हा गोड खाण्याची चर्चा होते, तेव्हा अनेकांच्या मनात काजू कतलीचाच विचार येतो. आपल्या आसपासच्या मिठाईच्या दुकानात काजू कतली सहज उपलब्ध असते. पण या काजू कतलीचा (Kaju Katli History) शोध कसा, कुठे लागला माहितीये?
काजू कतलीचा शोध 16व्या शतकात मराठा साम्राज्याच्या राजघराण्यातील प्रसिद्ध शेफ भीमराव यांनी लावला होता. राजघराण्याला प्रभावित करणारी नवीन मिठाई तयार करण्याचे काम भीमरावांना सोपवण्यात आले होते. भीमरावांनी पारशी गोड हलवा-ए-फारसीमध्ये बदामाऐवजी काजू वापरण्याचा प्रयोग केला आणि काजू कतलीचा शोध लागला.
हेही वाचा – ‘ती’ दुर्दैवी घटना आणि शॉपिंग करण्यासाठी चांगला दिवस…ब्लॅक फ्रायडे!
काजू कतलीचा शोध मुघल काळात लागला अशीही एक कथा आहे. शीख गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी जहांगीरने शाही स्वयंपाकघरात काजू कतली बनवली होती, असे म्हटले जाते. काही लोक म्हणतात की जहांगीरच्या शाही रसोईमध्ये दिवाळीच्या दिवशी काजू, साखर आणि तुपापासून बनवलेली मिठाई तयार केली होती. या निमित्ताने वाटलेली ही मिठाई लवकरच देशातील इतर भागातही लोकप्रिय झाली.
काजू कतली ही पारंपारिक भारतीय मिठाई आहे. यात मोठ्या प्रमाणात साखर असते. तरीही ही गुलाब जाम किंवा जिलेबीपेक्षाही चांगली मानली जाते. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये मैद्याचा वापर होतो आणि याच्यातही जास्त साखर असते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!