टायरचा रंग काळाच का असतो? पांढरे, हिरवे, निळे असे का नसतात? घ्या जाणून!

WhatsApp Group

Why tyres always black in color : तुम्ही तुमच्या आयुष्यात सायकलपासून महागड्या गाड्या रोज पाहत असाल. आजकाल सायकलही मॉडर्न झाल्या आहेत. सायकल म्हणा किंवा कार म्हणा या सर्वांबद्दल सामान्य गोष्ट अशी की या सर्वांना टायर असतो. टायर हा वाहनाचा महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या वाहनांचे टायर वेगवेगळ्या आकाराचे असतात. या टायर्समध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे रंग. तुम्ही कधी विचार केला आहे का की टायरचा रंग काळा का असतो? टायर इतर कोणत्याही रंगाचे का नसतात? जेव्हा आपण गाड्यांपासून प्रत्येक वस्तू खरेदी करतो तेव्हा त्यांचा रंग पाहून अनेक उत्पादनंही खरेदी करतो. पण टायरचा रंग कधीच आपली पसंती नसतो, कारण टायरचा रंग फक्त काळा असतो.

टायर्सचा इतिहास

असं का घडतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. टायर्सचा इतिहास १८०० वर्षांचा आहे. टायर हा मूळ फ्रेंच शब्द टायररपासून आला आहे, ज्याचा अर्थ ओढणं असा होतो. एअर रबर टायरच्या आधी, टायर चामड्याचे, लोखंडाचे किंवा लाकडाचे बनलेले होते, जे चाकांना तुटण्यापासून वाचवायचे.

हेही वाचा – फक्त १२ सेंकदात जमीनदोस्त होणार सुपरटेक ट्विन टॉवर! पण तो का पाडला जातोय?

पहिला रबर टायर

व्हीलराईट नावाच्या कारागिरानं प्रथम रबर टायरचा शोध लावला. १८०० मध्ये, चार्ल्स मॅकेनटोशनं अॅमेझॉन आणि इतर ठिकाणच्या झाडांच्या द्रवापासून रबर बनवलं. मात्र हवामानाशी ताळमेळ राखता आलं नाही. त्यानंतर चार्ल्स गुडइयरनं १८३९ मध्ये व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लावला, जो मजबूत आणि ताणण्यायोग्य होता. त्याचा वापर सायकलमध्ये केला जात असे.

पण या टायरमध्ये अनेक समस्या

१८४५ मध्ये न्यूमॅटिक किंवा हवेनं भरलेले टायर बनवले गेले. रॉबर्ट विल्यम थॉमसन यांनी या शोधाचं पेटंट स्वतःच्या नावावर केलं. थॉमसन स्कॉटिस हे शोधक होते. चामड्याच्या आवरणात हवा भरण्यासाठी त्यानं विविध आकाराच्या पातळ नळ्या बनवल्या. हे टायर हादरे सहन करू शकतील असे होते. मात्र अनेक समस्या असल्यानं ते कधीच उत्पादनात आले नाही.

हेही वाचा – ‘आलं’ फक्त चहात टाकण्यासाठी नसतं; ‘या’ आजारांसाठी ते रामबाण उपाय आहे!

पहिले रबर टायर पांढरे

पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की १२५ वर्षांपूर्वी जेव्हा पहिला रबर टायर तयार झाला तेव्हा त्याचा रंग पांढरा होता. ते तयार करण्यासाठी वापरलेले रबर दुधाळ पांढरे होते. पण ऑटोमोबाईलचं वजन सहन करेल आणि रस्त्यावर चांगले चालतील असे हे टायर नव्हते.

कार्बन ब्लॅक जोडल्यानं रंग बदलला

टायर शक्तिशाली आणि दीर्घकाळ चालण्यासाठी या रबरमध्ये कार्बन ब्लॅकसारखे पदार्थ मिसळले गेले, त्यामुळे टायरचा रंग पूर्णपणे काळा झाला. रंग काळा झाला, पण टायरची ताकद आणि जास्त काळ टिकण्याची क्षमता वाढली. टायरचा रस्त्याशी घर्षणाचा वाईट परिणाम कार्बन ब्लॅकमुळं दूर झाला. इतकंच नाही तर टायर्सचे संरक्षण करण्यासाठी आणि ओझोन ते अतिनील किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी कार्बन ब्लॅक उपयुक्त आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment