Heart attack Reason : पूर्वी हार्ट अटॅकचा म्हणजेच हृदयविकाराचा झटका येणं, ही समस्या बहुतेक वृद्धांमध्ये आढळून येत होती, परंतु आजकाल हा आजार तरुणांनाही बळी पाडत आहे. भारतातील प्रसिद्ध गायक केके ते सिद्धार्थ शुक्ला यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. अलीकडेच राजू श्रीवास्तवलाही हृदयविकाराचा झटका आला होता, भारतात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.
इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, इतर देशांतील लोकांपेक्षा भारतीयांना लवकर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३३ टक्के जास्त आहे. भारतीय तरुणांमध्ये हृदयविकाराची समस्या सर्वाधिक असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. जाणून घेऊया भारतीय तरुणांना हृदयविकाराचा झटका अधिक का येतो?
हेही वाचा – ट्विन टॉवर पाडण्याच्या काही तासांपूर्वी कळलं, की ‘तो’ बिल्डिंगमध्येच गाढ झोपलाय! मग पुढं….
तरुणांमध्ये हृदयविकाराची प्रमुख कारणं कोणती?
खराब जीवनशैली, मधुमेह, अतिमद्यपान, धूम्रपान आणि उच्च रक्तदाब, तणाव, नैराश्य यामुळं तरुणांमध्ये कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या निर्माण होत असल्याचं अनेक संशोधनातून समोर आले आहे.
हृदयविकाराचा झटका का येतो?
जेव्हा शरीरातील रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होऊ शकत नाही, तेव्हा रक्त गोठण्याची समस्या सुरू होते. या गुठळ्यांमुळं हृदयापर्यंत रक्त पोहोचणं कठीण होतं. यासह, हृदयाला ऑक्सिजन मिळणं देखील बंद होते, ज्यामुळं हृदयविकाराचा झटका येतो.
वयाच्या ३० वर्षानंतर तरुणांची दिनचर्या कशी असावी:
तरुणांनी धूम्रपान आणि अंमली पदार्थांपासून दूर राहावे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहाराची काळजी घ्यावी. आहारात अधिकाधिक ताजी फळे आणि भाज्या यांचा समावेश करावा.
हेही वाचा – सावधान..! हे १० पदार्थ रोज खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढेलच आणि हार्ट अटॅकही येईल; वेळ काढून वाचा!
शरीर सक्रिय ठेवण्यासाठी, नियमित चालणे, योगा, व्यायाम दिनक्रमात ठेवावे.
उंची नुसार योग्य ते वजन ठेवावे, जंक फूड आणि ड्रग्जचे सेवन बंद करावे.
जर तुम्हाला मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर आहारावर नियंत्रण ठेवा आणि वेळेवर औषधे घ्यावी.
आरोग्य तपासणी : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक व्यक्तीनं वेळेनुसार आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. या वयानंतर हल्ली तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत आहे. आरोग्य तपासणीनंतर तुमच्या शरीरातील कोणतीही कमतरता वेळेत समजून दूर करण्यास मदत होऊ शकते.
हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?
- प्राथमिक तुमच्याकडं डिस्प्रिन, इकोस्प्रिन किंवा ऍस्पिरिन असल्यास, तुम्ही ते रुग्णाला द्यावे. डिस्प्रिन, -इकोस्प्रिन किंवा ऍस्पिरिन ही औषधे रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात.
- जर कोणाच्या घरी हृदयरोगी असेल तर 5mg ची सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावी, त्यामुळे वेदनांची तीव्रता थोडी कमी होते.
- ताबडतोब जवळच्या रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधावा.