Snoring : झोपताना घोरणे ही सामान्य बाब आहे. हे बर्याच लोकांसोबत घडते. घोरणाऱ्याला ते कळत नाही, पण या घोरण्यांमुळे अनेकदा आजूबाजूच्या लोकांची झोप उडते. अनेक वेळा अति आणि मोठ्याने घोरण्यामुळे ते लोकांसाठी त्रासदायक ठरते. घोरण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. लोक सहसा याचा संबंध थकवा आणि चोंदलेले नाक यांच्याशी जोडतात. काही लोक तणावामुळेही घोरतात. मात्र दीर्घकाळात या समस्येमुळे मोठे आजार होऊ शकतात.
संशोधनानुसार, भारतातील 20 टक्के लोक नियमितपणे घोरतात आणि 40 टक्के लोक अधूनमधून घोरतात. घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी लोक अनेक उपाय आणि युक्त्या वापरतात, परंतु ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) चे डॉक्टर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही हलक्या झोपण्याच्या व्यायामाची शिफारस करतात. आ़ज तकने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय वंशाचे ब्रिटीश डॉक्टर करण राज म्हणतात की जिभेचे काही सोपे व्यायाम आहेत ज्यामुळे घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
हेही वाचा – रोज पैसे वाचवणाऱ्या ४ गाड्या..! मायलेजही दमदार; किंमत १० लाखांच्या आत!
त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, डॉ. करण राज यांनी जीभ बाहेर काढणे, एका बाजूने दुसरीकडे हलवणे आणि तोंडाच्या वरच्या बाजूला स्पर्श करणे यापर्यंतचे अतिशय सोपे व्यायाम दिले आहेत.
डॉ. राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, घोरणे कमी करण्याचा पहिला व्यायाम आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची जीभ पाच सेकंदांसाठी बाहेर चिकटवावी लागेल आणि काही काळ त्या स्थितीत ठेवावी लागेल. घोरणे कमी करण्यासाठी हा व्यायाम तीन ते चार वेळा करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तसंच तुम्हाला असं करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने जिभेला आधार देऊ शकता, असंही त्यांनी सांगितलं. दबाव न वाटता शक्य तितक्या दूर जीभ बाहेर काढा. या व्यायामाचा उद्देश शक्ती सुधारणे आणि स्नायूंना लवचिक बनवणे हा आहे. जीभ पाच सेकंद बाहेर ठेवा आणि नंतर जीभ पुन्हा तोंडाच्या आत घ्या. असे तीन ते चार वेळा करा.
डॉ. राज म्हणाले की, हे व्यायाम तुमच्या जीभ आणि घशाच्या स्नायूंची ताकद आणि संतुलन वाढवण्याशी संबंधित आहेत. या व्यायामामुळे स्नायू संतुलित होतील आणि झोपताना ते फडफडणार नाहीत. घसा आणि जिभेचे स्नायू बळकट झाल्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि घोरण्याची समस्याही दूर होईल.