Gold Silver Rate On Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानतात. आज, 10 मे रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. कालच्या तुलनेत आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 1506 रुपयांनी वाढला आहे.
शुक्रवारी, 10 मे रोजी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट लिमिटेडच्या मते, आज सोने आणि चांदीच्या दोन्ही किंमतींमध्ये वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव 1,500 रुपयांनी वधारला, तर चांदीच्या दरातही 2,000 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याची किंमत पाहिली तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 71502 रुपयांवरून 73008 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तसेच 23 कॅरेट सोन्याचा भाव 71216 रुपयांवरून 72716 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
22 कॅरेट सोन्याचा भाव 65496 रुपयांवरून 66875 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 53627 रुपयांनी महागला आणि 54756 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 41829 रुपयांवरून 42710 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 82342 रुपयांवरून 84215 रुपये किलो झाला आहे.
सोन्याचे भाव का वाढले?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने मागील किमतीच्या तुलनेत $52 ने मजबूत झाले आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 2360 डॉलर प्रति औंस झाली. अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांच्या ताज्या आकडेवारीने श्रमिक बाजारात मंदीचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. यूएस मधील बेरोजगारीच्या दाव्यांवरील नवीन डेटामुळे आत्मविश्वास वाढला आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याचा विचार करू शकते. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, जागतिक बाजारात चांदीची किंमत 28.60 डॉलर प्रति औंस होती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा