Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने घट; जाणून घ्या आजचा भाव 

WhatsApp Group

Gold Silver Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याने आज २ टक्क्यांहून अधिक झेप घेतली असून चांदीचा भाव सुमारे ३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पण, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ०.३२ टक्क्यांनी स्थिरावला तर त्याच वेळी, चांदीचा दर देखील आज MCX ०.२८ टक्क्यांनी स्थिरावला आहे.

बुधवारी सोन्याचा भाव आज ५१ ,४६५ रुपये आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर आज १७६ रुपयांनी घसरून ६१,७८३ रुपयांवर आहे. 

तुमच्या शहरातील सोने-चांदी आजचा भाव

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८०० रुपये आहे तर मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,०८० रुपये असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,०८० रुपये आहे.  नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,०८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०४ रुपये आहे.

हेही वाचा –देवगडच्या बापर्डे गावात येणार ‘ग्रेट’ सुधा मूर्ती..! ‘या’ कॉलेजचं होणार भव्य…

गेल्या आठवड्यात सोने वधारले

गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. गेल्या आठवडाभरात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४२ रुपयांनी तर चांदीचा भाव १४०५ रुपयांनी वाढला होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या ट्रेडिंग आठवड्याच्या सुरुवातीला (३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर) म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० होता, जो प्रति १० रुपये ५०,५२२ पर्यंत वाढला. 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment