Gold Silver Price Today In Marathi : भारतीय सराफा बाजारात गोंधळ सुरूच आहे. आज मंगळवारीही सराफा बाजारात उलथापालथ झाली. सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित घट नोंदवण्यात आली. 31 ऑक्टोबर रोजी भारतात सोन्याचा भाव 110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला होता. तर चांदीच्या दरात 320 रुपयांची घट झाली आहे. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,219 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला.
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,330 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, भारतीय सराफा बाजारात चांदीची किंमत 72,680 रुपये प्रति किलो झाली आहे. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याची किंमत 0.21 टक्क्यांनी म्हणजे 130 रुपयांनी घसरली आहे आणि 61,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर चांदीची किंमत 0.38 टक्क्यांनी म्हणजेच 278 रुपयांनी घसरून 72,477 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.
राजधानी दिल्लीत मंगळवारी सकाळी सोन्याच्या दरात 130 रुपयांची घट नोंदवण्यात आली. तर चांदीचा भाव 340 रुपयांनी घसरला. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,008 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 72,400 रुपये किलोवर आहे.
मुंबईत सोने (22 कॅरेट) 120 रुपयांनी स्वस्त होऊन 61,210 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,210 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 340 रुपयांनी घसरून 72,530 रुपयांवर आला.
हेही वाचा –Ration Card : सरकारचे कडक पाऊल, आता ‘या’ लोकांना नाही मिळणार मोफत रेशन!
तर कोलकात्यात सोने 110 रुपयांनी आणि चांदी 340 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता येथे 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 56,045 रुपये आणि 24 कॅरेट सोने 61,140 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीचा भाव 72,430 रुपये प्रति किलो झाला आहे.
तर चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 110 रुपयांनी घसरून 56,283 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आणि 24 कॅरेट शुद्ध सोने येथे 61,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उपलब्ध आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव 340 रुपयांनी घसरून 72,740 रुपये प्रति किलो झाला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!