Gold Silver Price Today In Marathi : सणांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने-चांदीच्या भावाने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सप्टेंबरमध्ये सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याची स्पॉट किंमत 59489 रुपयांवरून 57719 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे, तर चांदीची स्पॉट किंमत 74838 रुपयांवरून 71603 रुपये प्रति किलोवर आली आहे. 1 सप्टेंबर 2023 च्या बंद किंमतीच्या तुलनेत, सोने प्रति 10 ग्रॅम 1770 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीची किंमत 3235 रुपयांनी घसरली आहे.
IBJA ने दिलेल्या आकडेवारीनुसार, आता सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 4020 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. 5 मे रोजी सराफा बाजारातील 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 61739 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली होती. त्याचवेळी या दिवशी चांदीचा भाव 77280 रुपये प्रति किलो होता. आजच्या दरानुसार चांदी प्रति किलो 5500 रुपयांनी स्वस्त होत आहे.
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये भाव (Today Gold Silver Price)
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोने 52,617 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने उपलब्ध आहे. तर 24 कॅरेट सोने 57,400 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर दिल्लीत चांदीचा भाव 69,660 रुपये प्रति किलो आहे. मुंबई महानगरात सोन्याचा (22 कॅरेट) दर 52,708 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत चांदीचा भाव 69,780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोने 52,644 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 57,430 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने उपलब्ध आहे. तर चांदीचा भाव येथे 69,690 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 52,864 रुपयांना तर 24 कॅरेट सोने 57,670 रुपये प्रति 10 ग्रॅमला विकले जात आहे. तर चांदीचा भाव येथे 69,980 रुपये प्रति किलो आहे.
हेही वाचा – Lal Bahadur Shastri Jayanti : कारसाठी कर्ज घेणारा भारताचा पंतप्रधान, मृत्यूनंतर EMI कोणी भरला?
दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर सोने (Gold Silver Price In Marathi)
सोन्या-चांदीच्या दरात अलीकडे वाढ झाली होती. मात्र आता गेल्या आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सोने आता 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली आले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!