Gold Silver Price Today In Marathi : युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले! वाचा आजचा भाव

WhatsApp Group

Gold Silver Price Today In Marathi : आज गुरुवारीही (12 ऑक्टोबर) सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मध्यपूर्वेत सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय संकटामुळे सोन्याच्या दराला आधार मिळत आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलनेही हमासवर हल्ला चढवला आहे. हे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जगात जेव्हा जेव्हा कोणतेही भू-राजकीय संकट उद्भवते तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात.

सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Silver Price)

गुरुवारी सकाळी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 5 डिसेंबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 0.18 टक्क्यांनी किंवा 107 रुपयांच्या वाढीसह 58,047 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसले.

चांदीच्या दरातही वाढ (Todays Gold Silver Price In Marathi)

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही गुरुवारी वाढ झाली. 5 डिसेंबर 2023 रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा दर गुरुवारी सकाळी 0.37 टक्क्यांनी किंवा 259 रुपयांच्या वाढीसह 69,685 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता.

हेही वाचा – Business Idea In Marathi : ‘या’ वनस्पतीपासून बनतं ‘बायोडिझेल’, शेती केली तर होईल चांगली कमाई!

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या किंमत (Gold Price In Marathi)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी इब्जाकडून दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment