Gold Silver Price Today : वाढत्या गरमीसोबक सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याच्या वाढत्या किमतीने विक्रमी पातळी गाठली, तर चांदीने सार्वकालिक उच्चांक गाठला. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एका वर्षात त्याची किंमत सुमारे 20 टक्क्यांनी वाढली आहे. केवळ सामान्य माणूसच नाही तर केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत.
सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर 2010 मध्ये 10 ग्रॅम सोने 18500 रुपयांना विकले जात होते, मात्र आज ते 74000 रुपयांना विकले जात आहे. वाढती महागाई आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. सोने आणि चांदी हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानले जातात. 21 मे रोजी सोन्या-चांदीचे विक्रम मोडले. आज 21 मे रोजी सोने आणि चांदीने उच्चांक गाठला. यावर्षी 1 जानेवारी 2024 रोजी सोन्याचा भाव 63352 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकला जात होता, जो 21 मे 2024 रोजी 74214 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. तर 1 जानेवारी 2024 रोजी चांदी 73395 रुपये प्रति किलोने विकली जात होती, जी 21 मे 2024 रोजी 92873 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
हेही वाचा – गावसकरांची भविष्यवाणी! RCB Vs RR Eliminator सामन्यात कोण जिंकणार सांगितलं, म्हणाले, “एकतर्फी….”
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, सोने अचानक 839 रुपयांनी महागले आहे. मंगळवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 74214 रुपयांवर पोहोचली. चांदीही मागे राहिली नाही. चांदीच्या दराने आजचा उच्चांक गाठला आहे. चांदीचा भाव 6500 रुपयांनी वाढून 92873 रुपये किलो झाला.
सोन्याचा भाव
24 कॅरेट सोन्याची किंमत 74214 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
23 कॅरेट सोन्याची किंमत 73917 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत 67980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
18 कॅरेट सोन्याची किंमत 55661 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
14 कॅरेट सोन्याची किंमत 43415 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची किंमत 92873 रुपये प्रति किलो आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा