Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, सध्या सोन्याचा भाव 58 हजार प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर चांदीचा दर 70 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58557 रुपये आहे. तर, चांदीची किंमत ₹70800 आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी संध्याकाळी 999 शुद्धतेचे शुद्ध सोने ₹ 58631 प्रति 10 ग्रॅम होते, जे गुरुवारी सकाळी ₹ 58557 वर आले आहे. तसेच शुद्धतेच्या आधारे सोने स्वस्त झाले असून चांदी महाग झाली आहे.
हेही वाचा – Current Account म्हणजे काय? त्याचे फायदे किती? जाणून घ्या सर्वकाही!
ibjarates.com नुसार, आज म्हणजेच 7 जुलै रोजी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत ₹58332 वर खाली आली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने 53638 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धता सोन्याचा भाव 43918 वर आला आहे.
मोठ्या शहरातील दर (24 कॅरेट)
- दिल्ली – ₹ 59320
- मुंबई – ₹ 59160
- कोलकाता – ₹ 59160
- चेन्नई – ₹ 59560
- पाटना – ₹ 59220
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!