Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता पुन्हा वाढ झाली आहे. आज म्हणजेच गुरुवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोने आता 59 हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सकाळी डिलिव्हरीसाठी सोने, MCX एक्सचेंजवर 58638 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडले. मात्र, काही कालावधीनंतर सोन्याचा भाव 58453 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह दिसला. जागतिक स्तरावरही गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
चांदीमध्ये वाढ
सोन्याच्या दरात वाढ झाल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात आज गुरुवारी सकाळी वाढ होत आहे. सकाळी MCX वर डिलिव्हरीसाठी चांदी 71357 रुपये प्रति किलो वाढीसह उघडली.
हेही वाचा – Weather Update : मुंबईत ऑरेंज अलर्ट, गोव्यात शाळा बंद!
मिस कॉल देऊन जाणून घ्या भाव
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल द्या. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. तुम्हाला सतत अपडेट्स www.ibja.co किंवा ibjarates.com वर देखील मिळू शकतात. लोकांनी सोन्याच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे. ग्राहकाने हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट हॉलमार्किंग योजनेचे नियमन करते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!