Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीचा कालावधी अजूनही सुरूच आहे. गुरुवारी बंद झालेल्या सराफा बाजाराच्या तुलनेत शुक्रवारी सकाळीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.सोन्याचा भाव 60 रुपयांनी घसरला, तर चांदीचा भाव प्रतिकिलो 260 रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,459 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 59,410 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला. दुसरीकडे, मंगळवारी सकाळी चांदीचा भाव 72,480 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला.
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोन्याची किंमत 0.10% घसरल्यानंतर 59,373 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. 59,416 या उच्च पातळीवर आणि किमान 59,370 रुपयांवर व्यवहार झाला आहे. दुसरीकडे, MCX वर चांदीची किंमत 0.37% म्हणजेच 271 रुपयांच्या घसरणीसह 72,251 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे. या आधी चांदी 72,349 ची उच्च पातळी आणि किमान 72,250 रुपये प्रति किलोची पातळी करत होती.
हेही वाचा – LIC New Jeevan Shanti : दरमहा पेन्शन हवंय? ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!
महानगरांमध्ये सोने आणि चांदीचे दर
राजधानी दिल्लीत सोन्याचा (22 कॅरेट) भाव 54,322 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 24 कॅरेट सोने येथे 59,260 रुपयांना उपलब्ध आहे. त्याचवेळी दिल्लीत चांदीची किंमत 72,480 रुपये प्रति किलो झाली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,368 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,310 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचवेळी मुंबईत चांदीचा भाव 72,360 रुपयांवर आला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!