Gold Silver Price Today : देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. सर्वत्र लोक बाप्पाच्या भक्तीमध्ये मग्न आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा एक अतिशय शुभ मुहूर्त आहे. सोन्या-चांदीबद्दल बोलायचे झाले, तर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
आज सोन्या-चांदीचा भाव किती? (Gold Silver Price Today)
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आज सोन्याची किंमत (MCX Gold Price) 58,000 च्या जवळ आली आहे. याशिवाय चांदीचा भावही 71,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 58376 रुपयांवर घसरली आहे. त्याचवेळी 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 53688 रुपये झाली आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 43958 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 34287 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत आज 71020 रुपये झाली आहे.
हेही वाचा – Disease X : कोरोनापेक्षा ७ पटीने धोकादायक महामारी, 5 कोटी लोकांचा मृत्यू होण्याची भीती!
घरी बसून तपासा दर! (Gold Silver Price Today)
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुटी वगळता शनिवार आणि रविवारी दर जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेटसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!