Gold Silver Price Today : भारतीय सराफा बाजारात आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. याआधी सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सराफा बाजारात नरमाई दिसून आली. 26 सप्टेंबरला सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे 10 रुपयांनी, तर चांदीचा भाव 280 रुपयांनी घसरला. यानंतर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,047 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली.
तर चांदीचा भाव 71,850 रुपये प्रति किलोवर आला आहे. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीचे भावही कमी दिसून आले. येथे सोने 0.05 टक्क्यांनी घसरून 58,670 रुपयांवर आहे. तर चांदीची किंमत 0.42 टक्क्यांनी म्हणजेच 300 रुपयांनी घसरून 71,850 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
महानगरांमध्ये सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today)
राजधानी दिल्लीत सोन्याचा (22 कॅरेट) भाव 53,863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58,760 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर राजधानीत चांदीचा भाव 71,600 रुपये प्रति किलो आहे. मायानगरी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,955 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव येथे 71,720 रुपये प्रति किलो आहे.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील किंमत पहा
कोलकातामध्ये सोनं (22 कॅरेट) 53,882 रुपये प्रति दहा ग्रॅम विकले जात आहे. तर इथे 24 कॅरेट सोने 58,780 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकले जात आहे. कोलकात्यात चांदीचा भाव 71,630 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,102 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार होत आहे. तर चेन्नईमध्ये चांदीची किंमत 71,920 रुपये प्रति किलो आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!