Gold Silver Price Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुन्हा विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला अगदी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. जर तुमच्या मुला/मुलीचे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्न होणार असेल तर तुम्ही आतापासूनच सोने खरेदी करा.
26 जून रोजी भारतातील सोन्याचा किरकोळ दर अनेक शहरांमध्ये 60,000 रुपयांच्या खाली आला. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 59,180 रुपयांवर गेला आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅमची किंमत 54,250 रुपये आहे. आज, सोमवारी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बऱ्याच दिवसांनी बाजारात सोने इतक्या स्वस्तात विकले जात आहे, त्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर चमक निर्माण झाली आहे.
हेही वाचा – नितीन गडकरींची मोठी घोषणा! मार्केटमध्ये येणार इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या
गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात लक्षणीय घट झाली होती. मात्र या आठवड्यात त्याचा वायदा तेजीने सुरू झाला आणि भाव 69 हजारांच्या जवळ पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बेंचमार्क चांदीचा जुलै करार 516 रुपयांच्या वाढीसह 68,599 रुपयांवर उघडला.
असे जाणून घ्या सोन्याचे नवीनतम दर
देशातील सराफा बाजारात 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. अल्पावधीतच दरांची माहिती एसएमएसद्वारे सहज उपलब्ध होणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!