Gold Silver Price Today : तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. 24 जुलै (सोमवार) च्या तुलनेत आज म्हणजेच 25 जुलै (मंगळवार) 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांनी कमी झाली आहे.
आजचा दर
24 कॅरेट सोने 62,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 55,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 रुपयांवर गेला आहे. कालपर्यंत 24 कॅरेट सोने 62,300 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते, तर 22 कॅरेट सोने 55,650 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते.
हेही वाचा – VIDEO : “घरोघरी एक-एक किलो सावजी मटण वाटलं, तरीही आम्ही निवडणूक हरलो”
जर तुम्ही सोने विकण्याचा किंवा देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा एक्स्चेंज रेट 53,950 रुपये आहे. त्याच वेळी, आज 18 कॅरेट सोन्याचा एक्स्चेंज दर ₹ 45,500 प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या दरात आज वाढ होत आहे. मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी MCX वर डिलिव्हरीसाठी चांदी 74379 रुपये प्रति किलोवर उघडली.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी IBJA कडून दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!