Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या महिन्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवरून 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला आहे. शुक्रवारी देखील, MCX वर सोन्याचा भाव (MCX Gold Price) Rs.58,700 च्या आसपास आहे. याशिवाय चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथेही सोन्या-चांदीच्या किमती नरमल्या आहेत. कोमॅक्सवर सोन्याची किंमत 1940 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यापार करत आहे. याशिवाय चांदीची किंमत प्रति औंस 24 डॉलरवर कायम आहे.
MCX वर सोने आणि चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 58724 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदी 0.26 टक्क्यांनी घसरून 73379 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.
हेही वाचा – युवराज सिंग दुसऱ्यांदा बनला ‘बाप’, सोशल मीडियावर दिली Good News!
दिवाळीपर्यंत सोन्याचे दर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत आता सातत्याने घसरण होत आहे, पण दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 60,000 ते 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळे जे काही गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम ठरू शकतो.
सोने किती शुद्ध आहे ते तपासा!
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!