Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर!

WhatsApp Group

Gold Silver Price Today : आज, 23 मे 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 71 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 71337 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी 60,342 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (बुधवार), 24 मे रोजी सकाळी 60,704 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 60,461 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 55605 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 45528 पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने महाग होऊन आज 35512 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 71337 रुपये झाला आहे.

हेही वाचा – IPL 2023 : कडर रे भाऊ..! ऋतुराज गायकवाडचा मॅच विनिंग कॅच; पाहा Video

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment