Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर, ऑक्टोबर 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी सोने 377 रुपये किंवा 0.63 टक्क्यांनी घसरून 59,028 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. मागील सत्रात म्हणजेच बुधवारी ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्ट सोन्याचा दर 59,405 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
त्याचप्रमाणे डिसेंबर 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 415 रुपये किंवा 0.69 टक्क्यांनी घसरून 59,525 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मागील सत्रात डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट सोन्याचा भाव 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता.
त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2024 मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 538 रुपये किंवा 0.89 टक्क्यांनी घसरून 59,945 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याआधी बुधवारी, फेब्रुवारी करारातील सोन्याचा दर 60,483 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता.
हेही वाचा – Indian Railways : आता रेल्वे अपघातग्रस्तांना मिळणार 10 पट अधिक नुकसान भरपाई!
वायदा बाजारात चांदीची किंमत
डिसेंबर 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 953 रुपये किंवा 1.30 टक्क्यांनी घसरून 72,277 रुपये प्रति किलोवर होता. मागील सत्रात डिसेंबर करारासाठी चांदीचा भाव 73,230 रुपये प्रति किलो होता. त्याचप्रमाणे मार्च 2024 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 873 रुपये किंवा 1.17 टक्क्यांनी घसरून 73,743 रुपये प्रति किलो होता. याआधी बुधवारी मार्च कॉन्ट्रॅक्ट चांदीचा भाव 74,616 रुपये प्रति किलो होता.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव
कॉमेक्सवर, डिसेंबर 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी सोने 0.96 टक्क्यांच्या घसरणीसह $1,948.20 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते. स्पॉट मार्केटमध्ये सोने 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह $1,928.40 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत
कॉमेक्सवर, डिसेंबर 2023 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 23.45 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होती. त्याचप्रमाणे, स्पॉट मार्केटमध्ये चांदी 0.28 टक्क्यांच्या घसरणीसह 23.17 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होती.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!