Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 154 रुपयांनी घसरला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59150 रुपयांच्या पातळीवर घसरला आहे. तसेच चांदीचा दरही 400 रुपयांनी घसरला आहे. MCX वर चांदीचा दर रु.75500 च्या आसपास आहे. डॉलरच्या रिकव्हरीचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतीतही नरमाई दिसून येत आहे. कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $1956 पर्यंत घसरली आहे. तसेच चांदीही घसरली आहे. कोमॅक्सवर चांदीचा दर प्रति औंस $25 वर पोहोचला. यापूर्वी, गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत 8 टक्क्यांनी वाढ झाली होती, जी 9 आठवड्यांची उच्चांक होती.
हेही वाचा – PM Kisan Yojana : 14व्या हप्त्याची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी खात्यात येणार 2000 रुपये
सोन्या-चांदीबद्दल तज्ञांचे मत
चांदीच्या दरातील वाढ यापुढेही कायम राहू शकते. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अमित सजेजा म्हणाले की, एमसीएक्सवर चांदीचा दर आणखी वाढेल. त्यासाठी 76200 रुपये प्रतिकिलोचे उद्दिष्ट आहे. या ट्रेडसाठी रु. 74500 चा स्टॉपलॉस ठेवा.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!