Gold Silver Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज 16 ऑगस्ट रोजीही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, जो काल 54,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचप्रमाणे, 24 कॅरेट सोन्याचा भाव काल 59,760 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत आज 59,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची किंमत
आज, 16 ऑगस्ट, भारतात 1 किलो चांदीचा भाव 72,800 रुपये आहे, जो काल 73,000 रुपये प्रति किलो होता.
हॉल मार्क नसलेले सोने टाळा
सोन्याची खरेदी करताना हॉलमार्कशिवाय सोने टाळा, कारण अस्सल सोने ओळखण्यासाठी हॉलमार्क खूप महत्त्वाचा आहे. हॉल मार्क आयएसओ प्रमाणित आहे आणि ते सोन्याची पुष्टी करते. 24, 22, 21 आणि 18 कॅरेटच्या किमतींमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्क तपासणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – iMT Technology : क्लचशिवाय गीअरवाली कार कशी चालते? सोप्या शब्दांत समजून घ्या!
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याची किंमत
सोन्याची सध्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला एसएमएसद्वारे सोन्याची सध्याची किंमत मिळेल. कृपया लक्षात घ्या की ही सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!