Gold Silver Price Today : आज 15 जून रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार 15 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 350 रुपयांनी कमी झाला आहे. 14 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,050 रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तो आज 54,700 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे.
त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याच्या दरातही घट दिसून आली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,670 रुपये होता, तो बुधवारी 60,050 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३८० रुपयांची घट दिसून आली.
महानगरांमध्ये सोन्याचा दर
महानगर 22 कॅरेट 24 कॅरेट
- चेन्नई ₹55,050 ₹60,050
- मुंबई ₹54,700 ₹59,670
- दिल्ली ₹54,850 ₹59,820
- कोलकाता ₹54,700 ₹59,670
(सर्व किंमती प्रति 10 ग्रॅम आहेत)
सोने विक्रमी दरापेक्षा स्वस्त झाले
5 मे रोजी 24 कॅरेट सोन्याने 62,400 रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. तर आज 59,670 रुपयांना विकले जात आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतीची तेव्हापासूनची तुलना केली तर आज 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 2730 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.
हेही वाचा – Highway किंवा Express Way वर गाडी बंद पडलीय? क्रेडिट कार्ड येईल कामी!
जाणून घ्या आजचा चांदीचा दर
गुरुवारीही चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली. आज एक किलो चांदी 73 हजार 100 रुपये किलो दराने विकली जात होती, तर बुधवारी 74 हजार रुपये किलोने विकली जात होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 900 रुपयांची घसरण दिसून आली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!