Gold Silver Price Today : तुम्हालाही सोने, चांदी किंवा त्याचे दागिने खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी, या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, प्रति 10 ग्रॅम 600 रुपये आणि चांदी प्रति किलो 2600 रुपयांनी स्वस्त झाली. यामुळे खरेदीदार खूश दिसत आहेत. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सोन्या-चांदीचे नवे दर जाहीर होणार आहेत.
IBJA वर सोने आणि चांदीची स्थिती
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी (12 मे 2023), सोने प्रति दहा ग्रॅम 621 रुपयांनी स्वस्त झाले आणि 60964 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले. गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 90 रुपयांनी महागले आणि 61585 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
हेही वाचा – IPL 2023 : रागावलेल्या प्रेक्षकांनी फेकून मारले नट-बोल्ट, थांबवण्यात आली मॅच!
शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी चांदी 2695 रुपयांनी स्वस्त होऊन 72040 रुपये किलोवर बंद झाली. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 1466 रुपयांनी स्वस्त होऊन 74795 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा भाव
दिल्ली
22ct सोने : रु. 57100, 24ct सोने : रु. 62280, चांदीची किंमत: रु. 75000
मुंबई
22ct सोने : रु. 56950, 24ct सोने : रु. 62130, चांदीची किंमत: रु. 75000
कोलकाता
22ct सोने : रु. 56950, 24ct सोने : रु. 62130, चांदीची किंमत: रु. 75000
चेन्नई
22ct सोने : रु. 57370, 24ct सोने : रु. 62590, चांदीची किंमत: रु. 82000
हैदराबाद
22ct सोने : रु. 56950, 24ct सोने : रु. 62130, चांदीची किंमत: रु. 78700
बंगळुरू
22ct सोने : रु. 57000, 24ct सोने : रु. 62180, चांदीची किंमत: रु. 78700
अहमदाबाद
22ct सोने : रु. 57000, 24ct सोने : रु. 62180, चांदीची किंमत: रु. 75000
पुणे
22ct सोने : रु. 56950, 24ct सोने : रु. 62130, चांदीची किंमत: रु. 75000