Gold Silver Price Today : आज 14 जुलै 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 59 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 74 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59352 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 74953 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव गुरुवारी संध्याकाळी 59,329 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 59,352 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, काय आहेत आजचे पेट्रोल डिझेल रेट
आज सोन्या-चांदीचा भाव किती?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 59114 रुपये झाली आहे. तर 916 (22 कॅरेट) आज 54366 रुपये झाले आहेत. याशिवाय 750 शुद्ध (18 कॅरेट) सोन्याचा भाव 44,514 रुपयांवर आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धता असलेले सोने (14 कॅरेट) महाग होऊन आज 34,721 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 74953 रुपये झाला आहे.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी इब्जाकडून दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!