Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आज किती स्वस्त झाले सोने-चांदी

WhatsApp Group

Gold Silver Price Today : आज ११ एप्रिल २०२३ रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो ७४ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६०३२४ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ७४५१९ रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी ६०३५५ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज सकाळी ६०३२४ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ६००८२ रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर ९१६ शुद्धतेचे सोने आज ५५२७५ रुपये झाले आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४५२४३ वर आला आहे. त्याच वेळी, ५८५ शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते ३५२९० रुपयांवर आले आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ७४५१९ रुपये झाला आहे.

हेही वाचा – Horoscope Today : आजचा दिवस तुमच्या लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी कसा असेल, वाचा आजचे राशीभविष्य 

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारी ibja द्वारे दर जारी केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही  ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment