

Gold Silver Price After Budget 2024 : जर तुम्ही तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीला सोन्याचे, चांदीचे किंवा प्लॅटिनमचे दागिने भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने लवकरच स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 15 वरून 6 टक्के, तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी 15.4 वरून 6.4 टक्के करण्याची घोषणा केली. सरकारच्या या घोषणेमुळे सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने लवकरच स्वस्त होणार आहेत.
अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 च्या भाषणात सांगितले की, देशातील मौल्यवान धातूंच्या दागिन्यांमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन वाढविण्यासाठी, मी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के आणि प्लॅटिनमवर 6.4 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवतो.
अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर काय घोषणा होणार?
- सोन्याची नाणी : कस्टम ड्युटी म्हणजेच आयात शुल्क 15% वरून 6% पर्यंत कमी केले.
- सोन्याची वीट : आयात शुल्क 14.35% वरून 5.35%
- चांदीची नाणी : आयात शुल्क 15% वरून 6% केले.
- चांदीची वीट : आयात शुल्क 14.35% वरून 5.35% पर्यंत कमी केले.
- प्लॅटिनम, पॅलेडियम, ऑस्मियम, रुथेनियम, इरिडियम : आयात शुल्क 15.4% वरून 6.4% केले.
- मौल्यवान धातूची नाणी : आयात शुल्क 15% वरून 6% केले.
- सोने/चांदीचे दागिने : आयात शुल्क 15% वरून 6% केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!