Gold Price Today | सोन्याची खरेदी दिवसेंदिवस महाग होत असून गुरुवारी त्याच्या किमतीने नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रथमच प्रति औंस 2200 डॉलरच्या पुढे गेली असून देशात त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 67,000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. सोन्याची ही नवीन विक्रमी पातळी आहे.
गुरुवारी सोन्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे एमसीएक्सवर सोन्याचा भाव 66,943 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. कमोडिटी मार्केट सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सोन्याने ही नवीन विक्रमी पातळी गाठली. इंडियन बुलियन ज्वेलर्स (IBJ) च्या वेबसाइटनुसार, 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची राष्ट्रीय किंमत शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 65795 रुपये होती. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस $2,203.35 इतकी होती. फेब्रुवारीच्या मध्यापासून सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचे लक्षात येते.
हेही वाचा – पाकिस्तानातून आलेला खेळाडू अर्ध्या IPL 2024 मधून बाहेर…! लखनऊ संघाचे टेन्शन वाढले
सोन्याचे भाव अचानक का वाढले?
बुधवारी झालेल्या अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात अचानक झालेली ही वाढ दिसून आली. यूएस फेडने व्याजदरांबाबत घेतलेला निर्णय हे सोन्याच्या दरवाढीमागील कारण मानले जाऊ शकते. फेडरल रिझर्व्हने स्पष्टपणे सांगितले आहे, की महागाईत नुकत्याच झालेल्या वाढीचा आर्थिक धोरणावर परिणाम होणार नाही आणि बेंचमार्क व्याजदर 5.25-5.50 टक्क्यांवर स्थिर राहतील. यासोबतच पॉलिसी रेटमध्ये तीनदा कपात करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!